Skip to main content

१०. शायिस्तेखानाची फजिती

शायिस्तेखानाजी स्वारी: विजापूरच्या आदिलशाहाने जंगजंग पछाडले. पण शिवरायांपुढे त्याचे काही चालले नाही. त्याच्या प्रत्येक सरदाराला शिवरायांनी चांगलाच हात दाखवला. शेवटी आदिलशाहा नरम झाला. त्याने शिवरायांशी तह केला आणि स्वतंत्र राज्य मान्य केले. यामुळे काही काळ दक्षिणेची बाजू सुरक्षित झाली.

मग शिवराय उत्तरेतील मुघलांकडे वळले. मुघलांच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्राची धुळधाण उडाली होती. त्या वेळी दिल्लीला औरंगजेब हा मुघल बादशाह होता. त्याच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या. त्यामुळे बादशहा चिडला. त्याने आपुला मामा शायिस्तेखान याला शिवरायांवर पाठवले. तो पुण्यावर चालून आला. त्याच्याकडे पाऊण लाख सैन्य होते. शेकडो हत्ती,उंट आणि तोफा होत्या. शिरवळ, शिवापूर, सासवड अशी गावे घेत घेत शायिस्तेखान आला. त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. तो पुढे पुढेच येत होता. आणि एकदा मात्र डोंगराच्या खिंडित मराठ्यांनी त्याला गाठले. मराठे अतिशय चपळ, भीमथडी तट्टावर बसणारे ! चटणी-भाकर खावी, अंगावर घोंगडी टाकावी आणि वाऱ्याच्या वेगाने डोंगरदऱ्यांतून धावपळ करावी, यांत मराठे फार पटाईत. मराठयांच्या गनिमी काव्यामुळे शायिस्तेखानाचे सैन्य हैराण झाले. कंटाळून त्याने पुरंदरचा वेढा उठवला.
.......................................................................................

शाहिस्तेखान चे नाव मिर्झा अबू तालिब. शाहिस्तेखान ही पदवी , नाव नाही.

स्वराज्यावर चालून यायच्या अगोदर शाहिस्तेखान हा जाणत्या प्रांताचा सुभेदार नव्हता, तर तो दिल्ली आणि आग्रा मधील उच्च मुघल फळी मध्ये काम करणार होता.

त्याचे त्याच्या भाच्यावर म्हणजे औरंगझेब वर जीवापाड प्रेम.१६५८मध्ये शाहजहान आजारी पडला आणि भावा भावा मध्ये भांडणे चालू झाली , तेंव्हा शाहिस्तेखान हा औरंझेबाच्या मागे भक्कम उभा राहिला.

शाहिस्तेखान हा साधा सुद्धा माणूस नव्हता

  • त्याचे वडील असफ खान हे मुघल चे मधील वजीर. त्याचे आजोबा मिर्झा बेग पण वजीर. असफ खान आणि नूर जान्ह हे भाऊ बहीण. म्हणजे नूर जान्ह त्यावही सख्खी आत्या.
  • जिच्या साठी शाहजहान ने ताजमहाल बांधला त्या मुमताज चा सख्खा भाऊ.
  • औरंगझेब चा शाहिस्तेखान हा मामा.

शिवाजी महाराजांनी अफझलखान ला मारल्यानंतर आदिशाहीचा 33% भाग स्वराज्यात आला.आदिलशहा ने नंतर सिद्दी जौहर ला पाठवले त्याच काळात राजानी बादशाही मुलूखवर आक्रमणे केली पण बिदर च्या वेढ्यात अफझलखानच्या हातातून नशिबाने मरता मरता वाचलेला औरंगझेब ला शिवाजी महाराज काय चीज आहे ते कळून चुकले

त्या वेळी त्याने औरंगाबाद चा आपला सुभेदार शाहिस्तेखान याला सांगितले .
"भक्कम सैन्य घेऊन तुम्ही चाल करून जा. त्या दुष्टाचे परिपत्य करण्यासाठी झटा. त्याचा प्रदेश आणि किल्ले जिंकून घ्या. आणि त्या प्रदेशातील सगळी बंडाळी मोडून काढा.या आज्ञे प्रमाणे अमीरूलउमरा यांनी जमादिलावल च्या ५ तारखेस औरंगाबाद सोडले. नांदेडचा फौजदार मुक्तारखान याची औरंगाबादचा प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली. जमादिलावल महिन्याच्या ९ तारखेस (११ फेब्रुवारी ,१६६०) तो दक्षिणेकडे जाण्यास निघाला."[1]

महाराष्ट्र मध्ये फक्त 3 वर्षे (1660–1663) टीकलेला शाहिस्तेखान नंतर बंगाल मध्ये 1688 पर्यंत म्हणजे 25 वर्ष टिकला.(1663 ते 1688).

शिवाजी राजांचे या मोहीम मुळे महाराष्ट्र वाचला पण आजचा बांगलादेश चे इस्लामकीरकरांन या शाहिस्तेखान ने केले.पुढे 25 वर्षात त्याने पूर्ण बांगलादेश बदलून टाकला आणि तिथे प्रसिद्ध चितगोंग चे युद्ध पण केले.

.......................................................................................

मिर्झा अबू तालिब, (इ.स. १६०० -१६९४ )) शाइस्ता खान म्हणून ओळखले जाणारे मोगल सैन्यात एक सुभेदार आणि एक सेनापती होता. सम्राट औरंगजेब यांचे एक मामा, त्यांनी बंगालच्या मुघल गव्हर्नर म्हणून १६६४ ते १६८८ पर्यंत काम केले आणि ते पुतण्यांच्या कारकीर्दीत महत्त्वाची व्यक्ती होती. शाइस्ताखानच्या अधिपत्याखाली ढाका शहर आणि प्रांतातील मोगल सत्ता यांनी सर्वात मोठी उंची गाठली. या उल्लेखनीय कामांपैकी एक म्हणजे मुगल विजय म्हणजे चिटगांव . १६६० मध्ये त्यांना मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराजांविरूद्धच्या संघर्षात भाग घेण्यासाठी पाठवण्यात आले. तथापि, अचानक झालेल्या हल्ल्यात त्याचा पराभव झाला आणि त्याचा एक मुलगा गमावला. त्यानंतर त्यांनी पुणे सोडले आणि आपली छावणी औरंगाबाद येथे हलविली.

शाइस्ता खान पर्शियन वंशाचा होता. त्याचे आजोबा मिर्झा घियस बेग आणि वडील अबू-हसन आसफ खान हे अनुक्रमे मुगल सम्राट जहांगीर आणि शाहजहांचे वजीर होते. सम्राट जहांगीरने आपल्या कुटुंबाची सेवा आणि मुघल दरबारातील पदाची ओळख म्हणून मिर्झाला शाइस्ता खानची उपाधी दिली. शाहजहांच्या पत्नीचा भाऊ असल्याचे ते म्हणतात की ते चुलतभाऊ किंवा खरा आहे की नाही हे स्पष्ट झाले नाही.

शाइस्ता खान यांनी मुघल सैन्य व दरबाराचे प्रशिक्षण व सेवा बजावली. त्याने अनेक बढती मिळवल्या व विविध प्रांतांचा राज्यपाल म्हणून नियुक्त केले. यशस्वी सैन्य कमांडर म्हणूनही त्याने एक नावलौकिक वाढवला आणि जेव्हा या दोघांनी गोलकोंडाच्या राज्याविरुद्ध लढा दिला तेव्हा राजपुत्र औरंगजेबच्या आणखी जवळ गेला.


.......................................................................................

फिरंगोजी नरसाळा : मग शायिस्तेखान पुण्याकडे वळला. प्रथम त्याने चाकण किल्ला घेतला. चाकणच्या किल्ल्यात फिरंगोजी नरसाळ्याने मोठया मर्दुमकीने शायिस्तेखानाशी मुकाबला केला. दोन महिने फिरंगोजीने किल्ला लढवला. पण शयिस्तेखानाच्या तोफखान्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही. फिरंगोजी नरसाळ्याच्या शौर्यावर शायिस्तेखान खूश झाला. त्याने त्याला बादशाही चाकरीचे आमिष दाखवले. पण फिरंगोजी बदलला नाही.

लाल महालात शायिस्तेखान : शायिस्तेखान पुण्यात आला. त्याने शिवरायांच्या लाल महालात मुक्काम ठोकला. त्याच्या फौजेने लाल महाला भोवती तळ दिला. एक वर्ष गेले, दुसरे गेले, पण खान काही लाल महालातून हलेना. उलट तो अधूनमधून आपली फौज भोवतालच्या मुलखात पाठवी. रयतेची गुरे ओढून आणी, शेतीची नासधूस करी. अशा रीतीने त्याने भोवतालचा मुलूख उध्वस्त केला.

धाडसी बेत: शायिस्तेखानाची खोड मोडायचीच, असे शिवरायांनी ठरवले. खान लाल महाल बळकावून बसला होता, हे एका दृष्टीने शिवरायांना सोयीचे होते. कारण त्या वाड्यातल्या खोल्या, दालने, खिडक्या, दारे, वाटा, चोरवाटा यांची शिवरायांना सारी काही माहिती होती. शिवाय शिवरायांचे हुशार हेर खानाच्या गोटात शिरलेले होतेच. खुद्द शाहिस्तेखानाच्या महालात मध्यरात्री शिरावे आणि त्याला उडवावे, असा शिवरायांनी बेत केला. किती धाडस धाडसी बेत होता हा ! महालात शिरायला मुंगीला देखील थारा नव्हता. लाल महालाभोवती पाऊण लाख फौजेचा खडा पहारा होता. हत्यारबंद मराठ्याला गावात यायला शाहिस्तेखानाने मनाई केली होती. पण शिवरायांचा निर्धार एकदा झाला म्हणजे झाला.

 शिवरायांनी दिवस निश्चित केला तारीख ५ एप्रिल, १६६३ ची रात्र. वाजतगाजत लग्नाची वरात चालली होती. पुढे चंद्रज्योती जळत होत्या. शेकडो स्त्री-पुरुष नटूनथटून चालले होते. कोणी पालख्यांत,कोणी मेण्यांत, तर कोणी पायी. शिवराय आपली माणसे घेऊन त्या वरातीत शिरले होते. वरात पुढे निघून गेली. सर्वत्र सामसूम झाली. शिवराय आणि त्यांची माणसे लाल महालाच्या भिंतीकडे सरकली. यावेळी शाहिस्तेखान गाढ झोपला होता.

शायिस्तेखानाची खोड मोडली: वाड्याच्या भिंतीला भगदाड पाडून शिवराय आत शिरले. त्यांचा स्वतःचाच वाडा तो ! त्यांना त्याचा कानाकोपरा माहीत होता. खानाचे पहारेकरी पेंगत होते. शिवरायांच्या माणसांनी त्यांना बांधून टाकले. शिवराय आणखी आत शिरले. इतक्यात कोणीतरी तलवार घेऊन त्यांच्यावर धावून आला. शिवरायांनी त्याला ठार केले. त्यांना वाटले शायिस्तेखान असावा, पण तो त्यांचा मुलगा होता. गडबड झाली. लोक जागे झाले.

 शिवराय थेट खानाच्या खोलीत गेले. त्यांनी समशेर उपसली. शायिस्तेखान घाबरला. "सैतान ! सैतान ! म्हणून ओरडत खिडकीवाटे पळू लागला. शिवराय त्याच्यामागोमाग धावले. शायिस्तेखान खिडकीवाटे बाहेर उडी टाकणार तोच शिवरायांनी त्याच्यावर वार केला. खानाची तीन बोटे कापली गेली. प्राणावर आले होते ते बोटावर निभावले. खान खिडकीतून उडी टाकून पळाला "शिवाजी आला, धावा, धावा! पकडा, पकडा" असे मुद्दाम फसवण्यासाठी म्हणत शिवराय आणि त्यांची माणसे ओरडत पळत सुटली. खानाची माणसे घाबरून पळत होती. शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली. खानाची माणसे शिवरायांना रात्रभर शोधत राहिली.

 शायिस्तेखानाने तर हायच खाल्ली. 'आज बोटे तुटली, उद्या आपले शिर शिवाजी कापून नेईल' अशी भीती त्यांला वाटू लागली. औरंगजेब बादशहाला हा प्रकार समजताच त्याला भयंकर राग आला. तो शायिस्तेखानावर नाराज झाला. त्याने फर्मान काढून खानाची रवानगी बंगालमध्ये केली.

 मुघल सत्तेला बसलेला हा पहिला तडाखा मोठा जबरदस्त होता. शिवराय फत्ते होऊन आले. तोफा उडाल्या साऱ्या महाराष्ट्रात आनंदीआनंद झाला.
.......................................................................................

महाराष्ट्र मध्ये फक्त 2 वर्षे (1661–1663) टीकलेला शाहिस्तेखान नंतर बंगाल मध्ये 1688 पर्यंत म्हणजे 25 वर्ष टिकला.(1663 ते 1688).

शिवाजी राजांचे या मोहीम मुळे महाराष्ट्र वाचला पण आजचा बांगलादेश चे इस्लामकीरकरांन या शाहिस्तेखान ने केले.पुढे 25 वर्षात त्याने पूर्ण बांगलादेश बदलून टाकला आणि तिथे प्रसिद्ध चितगोंग चे युद्ध पण केले.

शिवाजी महाराजांच्याया अचाट कामगिरी पाहून काही वर्षानी किंवा काही पिढ्या त्यांना देव समजून मंदिरात पूजा करतील,पण असे देव बनयून त्यांचे अचाट गुण कडे आपण दुर्लक्ष करू नये

शाहिस्ते खान चे नवं मिर्झा अबू तालिब.शाहिस्तेखान हा साधा सुद्धा असामी नव्हता त्याचे वडील असफ खान हे मुघल दरबार मधील वजीर.असफ खान आणि नूर जान्ह हे भाऊ बहीण.नूर जन्हा आणि अकबर सम्राट चा मुलगा जहांगीर हे पती पत्नी.या शाहूंस्तेखान ची सखी बहीण म्हणजे मुमताज.जिच्या साठी ताजमहाल बांधला नि औरंगझेब चा शाहिस्तेखान हा मामा.

शाहीस्तेखानावर केलेला हल्ला हा या गनिमी काव्याच्या तंत्राचा विलक्षण आविष्कार होता. यामध्ये गुप्तता, नियोजन, वेळेचं भान, शत्रूच्या सवयी, सण, मानसिक आणि शारीरिक स्थिती याचा अभ्यास, निर्णयक्षमता, शत्रूला चकवणे, निवडक धाडसी, चतुर व विश्वासू लोकांकडून घडवून आणलेली धडक कारवाई या अनेक गुणांचं दर्शन घडतं. दोराच्या साहाय्याने चढून तानाजीने सिंहगड घेणे किंवा अवघ्या साठ मावळ्यांसह कोंडाजी फजर्ंदने पन्हाळा जिंकणे ही गनिमी काव्याची दुसरी उत्तम उदाहरणे आहे

पार्श्वभूमी

शिवाजी महाराज नुकतेच पन्हाळ्याच्य वेढ्यातून निसटले होते.आदिलशाही व मोगलशाही अशा दोन शाह्यांशी एका वेळी टक्कर घेणे कठीण आहे याची जाणीव असलेल्या राजांनी पन्हाळा सिद्दी जौहरला देऊन रुस्तुमेजमानतर्फे आदिलशाहीशी तातत्पूअरता तह केला होता. आता स्वराज्याचा वाढीचा विचार करणे गरजेचे होते. आणि शाहिस्तेखान पुण्यातून निघून गेल्याशिवाय केवळ अशक्य होती.

जसवंतसिंग वर औरंगझेब चा राग

राजांनी त्याचा सरदार जसवंतसिंहाला फोडायचा प्रयत्न केला होता. जसवंतसिंह हा शहाजहानच्या पक्षाचा होता. औरंगजेबाने शहाजहानला कैदेत टाकले व त्या वेळी शाहिस्तेखानाने औरंगजेबाची बाजू घेतली म्हणून जसवंतसिंहाला त्या दोघांचाही राग होता. सिंहगडच्या वेढय़ात त्याचे मन रमत नव्हते.पुढे हा जसवंतसिंग ने पण मराठ्या शि अश्या न तश्या कारणांनी संबंध येत राहिला.

रुस्तम जमान

गिफर्डच्या पत्रानुसार, रुस्तुमे जमान मुघलांना भेटला होता. (हा रुस्तुमे जमान आदिलशाहाचा सरदार व शहाजी राजांचा मित्र होता ज्याच्या मार्फत राजांनी आदिलशाहीशी तह केला होता) पण त्यांच्यात काय बोलणे झाले ते कोणाला कळले नव्हते. या वेळी नेताजी मोंगलांच्या मुलखात लुटालूट करत होता. मोंगलांनी त्याचा पाठलाग इतक्या जोराने केला की त्याला रोज चाळीस ते पन्नास मैलांची दौड करावी लागली. मात्र हा प्रदेश अत्यंत बिकट असल्याने आपण स्वत: नेताजीचा पाठलाग करू असे सांगून नेताजीचा पाठलाग करण्यापासून रुस्तुमे जमानने मुघलांना रोखले होते. आणि या सगळ्याचा परिणाम एवढाच झाला होता की नेताजी पसार झाला होता.

शाहिस्तेखान

शाहिस्तेखान हा मोगलाईतील एक मातबर सरदार. तो पुण्याला प्रत्यक्ष राजांच्या लालमहालात तळ देऊन बसला होता. एक-दोन दिवस नव्हे तर तब्बल दोन वर्षे. शाहिस्तेखान स्वराज्य जसं कुरतडत होता तसा हळूहळू राजांकडले लोक फोडत होता. आतापर्यंत खानाने चाकण, सासवड, इंदापूर काबीज करून सुप्यास वेढा घालून पुण्यावर हल्ला केला. त्याच वेळी कृष्णाजी काळभोर, बाबाजीराव होनप, नारोजीपंत पंडित इतकेच नव्हे तर अफजलखान भेटीच्या वेळी राजांबरोबर असणारा राजांचा अंगरक्षक संभाजी कावजी अशा महत्त्वाच्या व्यक्तींना फोडण्यात खान यशस्वी झाला होता. अफाट सैन्य घेऊन आलेल्या शाहिस्तेखानाशी प्रकाशयुद्ध खेळणे अशक्यच होते.

आता राजांनी आपल्या किल्ल्यात प्रवेश केलेल्या खानाला गुप्तहेरांमार्फत ठार न मारता स्वत:च मारायचा निर्णय घेतला.

योजना आणि हल्ला

सारी योजना आकार घेऊ लागली. काफी खानाच्या नोंदीनुसार, ‘एक दिवस मराठय़ांच्या सैन्यातील काही लोकांनी कोतवालाकडून दोनशे मराठय़ांना लग्नासाठी नगरात प्रवेश परवाना घेतला. आदल्या रात्री एक लहान मुलगा नवरदेवाच्या वेशात वाजतगाजत नगरात आला. साधारण त्याच वेळी काही मराठा सैनिकांनी हात बांधलेल्या इतर मराठीच कैद्यांना मारत झोडत सर्व चौक्यांवरू नेले. अशा प्रकारे सर्व मराठय़ांचा पुण्यात प्रवेश झाला’ (शिवाजी हिज लाइफ अँड टाइम, ग. भा. मेहेंदळे, पृ. २५५).

. बंदोबस्त आवश्यकचं होता. राजेंचा लालमहाल त्याने कब्ज्यात घेतला होता. त्यामुळे शास्ताखानाचा बंदोबस्त म्हणजे काळाची गरज झाली होती. राजगडी विचारचक्रे सुरु झाली. त्यातच शास्ताखानावर प्रत्यक्ष हल्ला करण्याचा बेत राजेंनी सांगितला. त्याप्रमाणे एकाअद्भूत धाडसाची अत्यंत काळजीपूर्वक आणखी राजगडावर होऊ लागली.

हा प्रवेश काही सहज नव्हता. सभासदीच्या नोंदींनुसार जागोजागी राजांना व त्यांच्या लोकांना चौकशीला तोंड द्यावे लागत होते. पण खानाच्या सैन्यात मराठे असल्यामुळे आम्ही सैन्यातील लोक आहोत व पहाऱ्यासाठी गेलो होतो असे सांगत राजांच्या दादाजी बापूजी व चिमणाजी बापूजी देशपांडे या वाटाडय़ांनी प्रवेश मिळवला होता. एक्याण्णव कलमी बखरीनुसार पुणेकर माळी फुलांचे हार खानास पोचवत असे. त्याचा मेहुणा राजांजवळ होता. त्याच्याकरवी राजांनी या माळ्याला पाचशे होनांना फोडले. या माळ्याने राजांना लालमहालातील सध्याच्या बदलांची माहिती दिली.महाराजांना लालमहाल परिचयाचाच होता.खानाने लालमहालात थोडे बदल केले होते.मुदपाकखान्याच्या बाजूस असलेला माती-विटांनी बंद केलेला दरवाजा आपल्या सैन्यांनी फोडण्यास सुरवात केली पण मुदपाकखान्यात काही नौकर जागे झाले.महाराजांचा नाइलाज झाला, मराठ्यांनी जागे झालेल्या नौकारांना सपासप कापून काढले.चिमणाजी व बापूजी आत घुसले.त्यांच्या व पाठोपाठ महाराज हि आत घुसले व पहिला घाव पडला तो शाहिस्तेखानाचा मुलगा अब्दुल फतेह खान याच्यावर अन तो जागीच ठार झाला नंतर महाराजांनी थेट शाहिस्तेखानाच्या शय्यागृहात प्रवेश केला तोपर्यंत खान जागा झाला होता.सर्वत्र कल्लोळ चालू झाला होता.त्यात शमादाने तेथील बायकांनी विझवली.सर्वत्र अंधार पसरला.खान हल्ला करणार तोच महाराजांनी त्याच्यावर हल्ला केला.महारांना वाटले खान मारला गेला असावा पण त्याच्या हाताची तीन बोटेच तुटली.

जेधे, चिटणीस आणि सभासदी बखरींनुसार, लालमहालावर हल्ला करणारी टोळी जेव्हा बाहेर पडली तेव्हा आधीच ठरल्यानुसार खुणेची इशारत झाली. कात्रज घाटात दबा धरून बसलेल्या लोकांनी झाडांना व बैलांना बांधलेल्या मशाली पेटवून दिल्या. त्या हल्लेखारांच्या मशाली समजून मुघल सैन्य त्या दिशेने गेले व हल्लेखोर विरुद्ध दिशेने सुखरूप सिंहगडी पोचले.

मे १६६० मध्ये पुण्यात आलेल्या शाहिस्तेखानाची मोहीम अखेरीस ८ एप्रिल १६६३ रोजी संपली होती.

लाल महाल

शिवाजीच्या ह्य अचाट मोहिमेचा शाहिस्तेखानाने इतका धसका घेतला की अवघ्या तिसऱ्या दिवशी म्हणजे ८ एप्रिललाच सारा कारभार जसवंतसिंहाकडे सोपवून तो पुण्याहून औरंगाबादला निघून गेला. पण शाहिस्तेखानाचे अपयश एवढे मोठे होते की पुढे लवकरच त्याची दख्खनची सुभेदारी काढून घेतली गेली. शाहिस्तेखानाबरोबर जयसिंगाचाही अपमान औरंगजेबाने केला.

हा शाहिस्तेखान महाराष्ट्रात खल नायक होता पण बंगाल यामध्ये त्याने आपल्या भाचा साठी म्हणजे औरंगझेब साठी खूप काम केले.

जगाच्या इतिहासात ट्रॉय ची लढाई अशीच होती.पण भारतात मात्र अशी लढाई खुद्द मराठयानी 14 व्या शतकात मलिक उततुजर ला मागण्या साठी विशाळ गड ला मोरे आणि सुर्वे ने केलेली होती.(महाराष्ट्राच्या इतिहासातली एखादी प्रेरणादायी गोष्ट सामायिक कराल काय? चे Ashish Maliने दिलेले उत्तर)

.......................................................................................

✍️संकलन : सुमित रवि सरवदे

Comments

Popular posts from this blog

६. स्वराज्याचे तोरण बांधले

रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसह, स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. पण केवढे अवघड कार्य होते ते ! दिल्लीचा मोगल बादशहा, विजापूरचा आदिलशाही सुलतान, गोव्याचे पोर्तुगीज, आणि जंजिऱ्याचा सिद्धी अशा चार सत्ता त्या वेळी महाराष्ट्रावर हुकूमत गाजवत होत्या. या सत्तांचा दरारा मोठा होता. त्यांच्याविरुद्ध ब्र काढायची कुणाची हिंमत नव्हती. अशा बिकट परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्याचा मंत्र उच्चारला होता. कुठे शत्रूच्या फौजांचे अफाट बळ आणि कुठे शिवरायांच्या सवंगड्यांचे अल्प बळ ! शिवरायांचा निश्चय अढळ होता. त्यातूनच बळ निर्माण झाले. तोरणगड : शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व इंदापूर या परगण्यांची जहागिरी होती. जहागिरीतील किल्ले विजापूर दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते. किल्ल्यांशिवाय कसले आहे स्वराज्य. ज्याचे किल्ले त्याचे राज्य ! किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता चालते. डोंगरी किल्ला म्हणजे राज्याचा एक मुख्य आधार. तेव्हा एखादा भक्कम केला लवकर हस्तगत केला पाहिजे, असे शिवरायांनी मनाशी ठरवले.  तोरणा किल्ला शिवरायांचा डोळ्यापुढ...

३.मराठे सरदार-भोसल्यांचे कर्तबगार घराणे

धामधुमीचा काळ : संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला. तर शूर मराठे सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली. तो काळच मोठा धामधुमीचा होता. महाराष्ट्रात आदिलशहा आणि निजामशहा यांच्यात नेहमी लढाया होत. लढाईसाठी त्यांना फौज लागे. या कामी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत. शूर मराठे सरदार : मराठे काटक व शूर होते. तसेच ते धाडसी होते, स्वामीनिष्ठ होते. लढाईवर मोठ मोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे. हातात भाला, कमरेला तलवार असे हे धाडसी मराठा जवान घोड्यावर मांड घालून सरदारांच्या फौजेत दाखल होत. मराठे सरदार फौजबंद असत. कोणताही फौजबंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला, की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी. त्याला सरदारकी देई कधीकधी जहागिरीही देई. जहागिरी मिळालेले सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे समजत. विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठे मोठे मराठे सरदार होते. त्यात सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे, वेरुळचे भोसले हे प्रमुख होते. सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज. जिजाई सिंदखेडच्या लखुजी जाधवांची मुलगी ...