पन्हाळा जिंकला आणि आदिलशाहा चिडला : अफजलखानाच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडाला. त्याच्या मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला. त्यामुळे आदिलशाहा भयंकर चिडला. त्याला अन्नपाणी गोड लागेना. शिवरायांचा नाश करण्यासाठीच त्याने सिद्धी जौहर या सरदाराला पाठवले. त्याची मोठी फौज घेऊन सिद्धी जौहर निघाला. फाजलखान हि बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्याच्या बरोबर निघाला. ......................................................................................... शिवभक्त- स्वामीनिष्ठावान वीर बाजीप्रभू देशपांडे ......................................................................................... पन्हाळगडा विषयी थोडंसं : १. पन्हाळगड हा महाराष्ट्रातील सर्वात जुना किल्ला समजल्या जातो. त्याचे निर्माण शिलाहार घराण्याचा राजा भोजराजा नृसिंह ह्याने १२०० वर्षाआधी केले होते. तो किल्ला नागवंशीय वंशाकडे असल्यामुळे त्याचे नाव पाली भाषेत होते आणि ते म्हणजे ' पन्नग्नालय ' .आणि त्याचा अर्थ अजिंक्य असा होतो. २. पन्हाळगडावर इ.स.१६६० मध्ये सिद्...