Skip to main content

८. प्रतापगडावरील पराक्रम

आदिलशाही हादरली : विजापूरच्या दरबारातील गोष्ट. शिवरायांच्या वाढत्या हालचाली ऐकून आदिलशाही दरबार काळजीत पडला. दरबारात झाडून सारे सरदार गोळा झाले. एकेक गाजलेले समशेरबहाद्दूर दरबारात हजर होते. आदिलशाही कारभार बघणारी बडीसाहेबा जातीने दरबारात हजर होती. दरबारापुढे महत्त्वाचा प्रश्न होता, "शिवाजीचा बिमोड कसा करायचा?" 

बडीसाहेबा हिने दरबारातील सरदारांना खडा सवाल केला, "सांगा, कोण तयार आहे शिवाजीचा बंदोबस्त करायला?" 

दरबारात शांतता पसरली. जो तो आपल्या जागी चूप ! शिवरायांशी मुकाबला करण्याचे धाडस कोण दाखवणार? जो तो एकमेकांकडे बघू लागला. तेवढ्यात धिप्पाड देहाचा एक सरदार लवून मुजरा करत पुढे आला. त्याचे नाव अफजलखान.

........................................................................................


अफझलखान

.........................................................................................

🤔अफजलखाना विषयी थोडे:

ज्या अफझल खानाने शिवाजी महाराज्यांच्या ज्येष्ठ बंधूंना संभाजी राजांना फसवून मारले ,त्याच अफझल खानाला स्वतःच्या 64 बायकांना स्वतःच्या हातानी माराव्या लागला ते पण अफझल खान चा गुरू आणि त्याला वाटत असणंरी शिवाजी महाराजची भीती कारणीभूत ठरले. आणि हे घडले प्रतापगडच्या युद्धा आधी आधी विजपुरात.

विजापूर -मध्ये-अथणी रस्त्यावर विजापूरपासून अगदी 7 कि.मी.वर एका निर्जन जागी एक विहीर असून तिला आज ‘खून बावडी’ म्हणतात.

३ मजल्यांची रचना असणारी खुनी बावडी सुबक पणे उभी आहे. काहींच्या म्हणण्यानुसार या विहिरीत अफझलखानाच्या या सर्व बायकांना ढकलून देण्यात आले तर काहींच्या मते क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली. यावेळी एक पत्नी पळून जात होती. तिलाही पाठलाग करून ठार करण्यात आले. या सर्वांना त्याच ठिकाणी दफन करण्यात आले. त्यामुळे तेथे 64 कबरी असल्या तरी विजापुरात हा भाग ‘साठ कबर’ म्हणून ओळखला जातो. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात इंग्रजांनी हिंदुस्थानात पुरातत्त्व विभागाची स्थापना केली होती. त्या खात्याअंतर्गत इ.स. 1880 साली या खात्याचे प्रमुख हेन्री पुसेन्स यांनी संबंधित क्षेत्राची पाहणी करून साठ कबरींची माहिती फोटोसह संग्रहित केली होती. विशेष म्हणजे लंडनमधील ब्रिटिश संग्रहालयात तो फोटो उपलब्ध आहे.

 ठिकाण मराठा इतिहासाशी अप्रत्यक्षपणे नाते सांगते कारण हे ठिकाण *बुतशिकन, कुफ्रशिकन खान ए खानान - सिपेह सालार- अफजल खान* ह्या विजापूरच्या विख्यात सेनापतीशी संबंधित एक दुःखद आठवण बाळगून तिचा इतिहास सांगत आजही उभे आहे. .

विजापूरच्या आदिलशाही दरबारातील सर्वांत बलशाली सरदार म्हणून ज्याची ख्याती होती त्याचे नाव अफजलखान! खानाचे मूळ नाव अब्दुल्ला असून तो एका भटारणीचा मुलगा होता. संपूर्ण दक्षिण प्रांतात खानाची दहशत होती. अफझलखान किती पराकोटीचा अहंकारी होता याचा प्रत्यय त्याच्या शिक्क्यातून येतो. त्याने शिक्क्यावर लिहिले होते.

गर्र अर्ज कुनद सिपहर अअला, फजल फुजला व फजल अफझल

अझ हर मुल्की बजाए तसबीह आवाझ आयद अफझल अफझल

अर्थ : उच्च स्वर्गाला उत्तम माणसांची उत्तमता आणि अफझलखानाची उत्तमता यांची तुलना करून दाखवण्याची इच्छा झाली, तर प्रत्येक ठिकाणाहून जपमाळेतील (नामाच्या) आवाजाऐवजी अफझल अफझल असे शब्द येतील.

अफजल खानासोबत शिवाजी महाराजांचे राजकीय वैरासोबतच वयक्तिक वैर सुद्धा होत. अफजल खानाविषयी आऊसाहेब जिजाऊंना आणि शिवाजी महाराजांना भयंकर संताप होता कारण एक म्हणजे शिवाजी महाराजांचे जेष्ठ बंधू संभाजी राजे यांच्या मृत्यूलाही अफजल खान जवाबदार होता. त्याने छळ-कपट करून शिवाजी महाराजांच्या जेष्ठ बंधूंना ठार केले हिते. दुसरे कारण म्हणजे अफजल खानाने शहाजी महाराजांना देखील बेड्या ठोकल्या होत्या, केवळ मुत्सद्दी पणामुळेच शाहजी राजे बचावले होते. अफजल खान अत्यंत क्रूर निर्दयी आणि स्वार्थी होता. . अफजल खान एक शायर आणि कवी सुध्दा होता. त्याला संस्कृत भाषेचही ज्ञान होत तो एक नंबरचा नास्तिक होता. त्याने पर्शियन भाषेत एक शेर लिहिला होता. त्याचा मराठी भाषेत असा अर्थ होतो, जेव्हा कधी देवाला भीती वाटेल तेव्हा तो देव सुद्धा अफजल खान तू मला वाचव असे म्हणेल यातून त्याचा स्वतः विषयीचा महाभयंकर गर्व दिसून येईल.

अफजल खान इतका क्रूर होता की त्याने कित्तेक लोकांना दगा फटका करून ठार केले होते. तो सत्ता धारण आणि राजकारणामध्ये प्रचंड क्रूर आणि स्वार्थी होता, पण स्वतः च्या जहागिरीतील लोकांनविषयी प्रचंड न्यायी, दयाळू आणि उदार हृदयाचा असल्याचा दाखवत होता. अफजल खानचा देवावर विश्वास नसला तरी शुभ-शकुन आणि भविष्य त्योतिष्य यांवर विश्वास होता

’शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करून आदिलशहाला आव्हान द्यायला सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्याकरिता अलिआदिलशहा दुसरा व त्याची आई बडी बेगम (उलिया जनावा ताज सुलताना) यांनी दरबारातील सरदारांना आव्हान देताच ही जबाबदारी अफजलखानाने आपल्या शिरावर घेतलेली होती.

अफजलखान म्हणजे स्वराज्यावर आलेले सर्वात मोठे संकट होते कारण ताकद, राजकीय बुद्धिमत्ता आणि भयंकर क्रूरता या तीनही गोष्टींचा संगम खानाच्याकडे होता.

शाही फर्माने आणि प्रचंड मोठी फौज घेऊन जाण्याची तयारी सुरू झाली तेव्हा खानाने या स्वारीविषयी कौल मागताच त्याच्या गुरूकडून या स्वारीत तुला फार मोठे अपयश येणार असून तुझ्या जीविताला धोका पोहोचेल असे भाकीत वर्तविले, परंतु अफजलखानाने आपला बेत रद्द न करता मोहिमेवर जाण्याचे निश्चित केले. दुसऱ्या दिवशी त्याच्या बाबतीत आणखी एक दुःखद बातमी घडली. ती म्हणजे त्याच्या सैन्यदलातील झेंडय़ाचा हत्ती (ढालगज) फत्तेलष्कर हा अचानकपणे मरण पावला. साहजिकच खानाच्या मनामध्ये शंकाकुशंका सुरू झाल्या. यावेळी खानाला 64 बायका असून आपल्या माघारी यांचे काय होईल हा प्रश्न उभा राहिला. हा गुंता त्याने आपल्या क्रूर स्वभावाने मार्गी लावला.

अफजल खानाला ऐकून ६४ बायका होत्या. लढाई मध्ये चुकन आपला मृत्यू झाला. तर आपल्या बायका दुसऱ्या कुणासोबत तरी लग्न करतील ही कल्पना सुद्धा त्याला सहन झाली नाही. त्याने प्रताप गडावर शिवरायांच्या भेटीला येण्या पूर्वीच आपल्या सर्व बायकांना संपवण्याच्या निर्णय घेतला. त्या साठी त्याने विजापूर शहरापासून 7 किलोमीटर दूर असलेल्या एका निवांत जागेची निवड केली. त्या ठिकाणी त्याने ऐकून 64 कबरी खोदून घेतल्या त्या कबरीन पासून काही अनंतरावर पाण्याने भरलेली एक जुनाट विहीर होती. मोहिमेवर निघण्या अगोदरच त्याने आपल्या बायकांना पाण्यात बुडवून ठार केले आणि त्या कबरीनमध्ये दफन करुन टाकले. तिथे ऐकून 64 कबरी असल्या तरी विजापूर मधला हा भाग साठकबरीया ह्या नावाने प्रसिद्ध आजे अफजल खानाच्या या बायकांच्या कबरी आजही कर्नाटक मधल्या विजापूर जवळील साठकबर नावाच्या गावात अस्तित्वात आहेत. ‘द हिंदू’ या इंग्रजी वर्तमानपत्राने 18 जानेवारी 2013 रोजी याची दखल घेऊन याबाबत प्रसिद्धी दिली होती.

विजापुरात गेलो तर तिथं आदिलशहाची कबर तर शिवरायांचा पुतळा आहे. विजापुरात गोल घुमट, मुलुखमैदान तोफ, अनेक नामांकित वास्तू पाहताना त अगदी नापीक जमिनीच्या परिसरात एक चिरेबंदी विहीर असून त्याच्या शेजारी एका भव्य दगडी चबुतऱ्यावर शिस्तबद्ध पद्धतीने काळय़ा पाषाणात या 64 कबरी आजही पाहण्यास मिळतात. दक्षिण उत्तर बाजूने चबुतऱ्याची लांबी जास्त असून त्यानुसार पहिल्या दोन रांगेत 7-7 समाधी आहेत, तर तिसऱया रांगेत 5 व 11 समाधींच्या 4 रांगा आहेत. सध्या काही समाधी उद्ध्वस्त झालेल्या आहेत.

एकाच चबुतऱ्यावर 64 समाध्या पाहताना इतिहास माहीत असेल तर मन हेलावून जाते. साधारणपणे यातील 42 समाध्यांना चुना लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्याच्याच बाजूला खानाने स्वतःसाठी कबर बांधण्याची आज्ञा दिल्याचे म्हटले जाते, परंतु छत्रपती शिवरायांनी प्रतापगडावर खानाची कबर बांधली हा भाग वेगळा. स्मशानभूमीचा भाग वेगळा असेल, परंतु एकाच ठिकाणी एका रांगेत एवढय़ा मोठय़ा प्रमाणात अशा समाधी पाहण्यास मिळत नाहीत. ज्याला रक्तरंजित इतिहास आहे.

पुरातत्व खात्याने हा भाग संरक्षित क्षेत्र म्हणून ताब्यात घेतलेला आहे, मात्र तितकेसे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे साठ कबरींची दुरवस्था व्हायला लागली आहे. विशेष म्हणजे खानाचे वंशज गुलबर्गा जिह्यातील अफजलपूरला राहतात. त्या ठिकाणी खानाने बांधलेली मशीद व इतर वास्तू पाहण्यास मिळतात. पाहण्याचा चष्मा बदलला की प्रत्येकाची दृष्टी बदलते. त्यामुळे तिथे खानाला संताची उपमा दिली तर नवल वाटायला नको. एकंदर या घटनेविषयी मतमतांतरे असली तरी विजापुरात गेल्यानंतर साठ कबरींचा इतिहास हा वास्तूच्या रूपाने आजही जिवंत आहे.

विजापूरचा नकाशा आणि साठ कबर

.................................................. ........................

खानाने विडा उचलला : तबकातील वेळा उचलत अफजलखान म्हणाला, ''शिवाजी? कुठला शिवाजी? त्याला मी जिवंत कैद करून येथे पकडून घेऊन येतो आणि तसा नाही सापडला तर त्याला ठार मारून विजापुरी आणतो आणतो.'' 

अफजलखान म्हणजे विजापूर दरबाराचा भारी सरदार. तुफान ताकतीचा ! पोलादी पहार हाताने वाकवणारा. भल्याबुऱ्या कोणत्याही मार्गाने आपले काम करण्यात त्याचा हातखंडा ! अशा अफजलखानाने शिवरायांना जिवंत पकडून किंवा मारून आणण्याचा विडा भर दरबारात उचलला. सारा दरबार खुश झाला. दरबारात हजर असलेल्या प्रत्येकाला वाटले, आता शिवाजी भोसला कसला जिवंत राहतो ! थोड्याच दिवसात विजापूर दरबारात साखळदंडात बांधलेले अवस्थेत शिवाजी हजर होणार, नाहीतर त्याचे मुंडके तरी दरबाराला सादर होणार.'

अफजलखान मोठ्या ऐटीने, थाटामाटात विजापुरातून बाहेर पडला. त्याने आपल्याबरोबर प्रचंड फौज व लढाई चे सामान घेतले. अफजलखान बारा वर्ष वाईचा सुभेदार होता. त्यामुळे त्याला त्या मुलखाची चांगली माहिती होती. मोठ्या घमेंडीने तो महाराष्ट्राची वाट चालू लागला.

स्वराज्यावरील संकट : शिवराय त्या वेळी राजगडावर होते. त्यांना अफजलखान चालून येत आहे ही बातमी कळली. स्वराज्यावर मोठे संकट आले, हे त्यांनी ओळखले. पण ते डगमगले नाहीत. त्यांनी विचार केला, खान कपटी, त्याची फौज मोठी. आपले राज्य लहान, आपले सैन्य लहान. उघड्या मैदानावर काही खानापुढे आपला निभाव लागणार नाही ! त्याच्याशी युक्तीने सामना दिला पाहिजे, असे शिवरायांनी ठरवले. ते राजगडावरून निघाले आणि प्रतापगडाकडे त्यांनी कूच केले.

अफजलखानाचे डावपेच : शिवराय प्रतापगडावर गेले, ही बातमी खानाला कळताच तो चिडला. त्याला माहित होते, प्रतापगडावर चालून जाणे सोपे नाही. कारण तो किल्ला होता डोंगरात. भोवताली घनदाट जंगले होती, वाटेत उंच उंच डोंगर होते. फौजेला जायला चांगली वाट नव्हती, तोफा चालवायला मार्ग नव्हता. शिवाय तेथे जंगली जनावरांचा तर भयंकर सुळसुळाट !

शिवरायांनी प्रतापगड खाली उतरून यावे, म्हणून खानाने डावपेच खेळण्यास सुरुवात केली. तुळजापूर, पंढरपूर या देवस्थानाला उपद्रव दिला. रयतेचा खूप छळ केला. हे ऐकून तरी शिवराय प्रतापगड सोडतील व बाहेर येतील, असा खानाचा डाव होता. शिवरायांनी खानाच्या डाव ओळखला. त्यांनी प्रतापगड सोडलाच नाही. 

तेव्हा खानाने दुसरा डाव टाकला. प्रेमळपणाचे सोंग घेऊन त्याने शिवरायांना निरोप पाठवला, "तुम्ही माझ्या मुलासारखे. मला भेटायला या. आमचे किल्ले परत द्या. तुम्हाला मी आदिलशहाकडून सरदार की देववितो.

शेरास सव्वाशेर : खान आपल्याशी कपटी डाव खेळतो आहे, हे शिवरायांनी झटकन ओळखले. ते सावधगिरीने वागत होते. त्यांनी खानाला प्रतापगडाखाली खेचून आणण्याचा निर्धार केला. त्यांनी खानाला निरोप पाठवला, "खानसाहेब, मी तुमचे किल्ले घेतले. मी अपराधी आहे. मला क्षमा करा. आपणच प्रतापगडाखाली भेटायला यावे. मला तिकडे येण्याची भीती वाटते."

शिवरायांचा निरोप ऐकून अफजलखान हसला. "व्वा ! बहुत खुशी." आपली दाढी कुरवाळत तो म्हणाला. त्याला वाटले, या अफजलखानापुढे शिवाजीची काय बिशाद ! हा डरपोक माझ्याशी कसली लढाई खेळतो ! आपण जावे आणि भेटीत त्याला चिरडून टाकावे. बस्स ! खान शिवरायांना प्रतापगडाखाली भेटायला तयार झाला.

भेट ठरली : प्रतापगडाखालच्या माचीवर भेटण्याची जागा ठरली. दिवस ठरला, वेळ ठरली. 

.........................................................................................

'जनीचा टेंबा' असे त्या जागेचे सध्याचे नाव आहे.याच जागेवर १० नोव्हेंबर १६५९ रोजी छत्रपतींनी अफजलखानास यमसदनी धाडले होते.याच जागेवर या सुप्रसिद्ध भेटीसाठी आलिशान शामियाना उभारण्यात आलेला होता.आता या ठिकाणी अफजलखान व सय्यद बंडा यांच्या कबरी आहेत;मात्र तेथे जाण्यास मज्जाव आहे.ही जागा प्रतापगडच्या माचीवर आहे.

भेटीची व वधाची जागा ( चित्रातील मध्यभागी दिसणारा तंबू )

..........................................................................................

भेटीच्या वेळी दोघांनी आपल्याबरोबर एकएक सेवक आणावा आणि आपले दहा अंगरक्षक ठरलेल्या ठिकाणी दूर ठेवावेत असे ठरले. महाराजांनी खानासाठी चांगली वाट तयार करवून घेतली. भेटीसाठी छानदार शामियाना उभारला.

शिवराय फार सावध गिरीने वागत होते. त्यांनी आपल्या फौजेच्या निरनिराळ्या टोळ्या केल्या. जंगलात कोणी कोठे लपून राहायचे, काय करायचे याबद्दल त्यांना सूचना दिल्या. कडेकोट बंदोबस्त केला. खान कपटी आहे, शिवरायांनी त्याची भेट घेऊ नये, असे शिवरायांना काही सल्लागारांनी सांगितले. पण शिवरायांनी खानाला भेटीचे नक्की ठरवले.

भेटीची तयारी : भेटीचा दिवस उजाडला. सकाळी शिवरायांनी भवानीदेवीचे दर्शन घेतले. थोड्या वेळाने त्यांनी पोशाख करावयास सुरुवात केली. पायांत सुरवार चढवली. अंगात चिलखत घातले. त्यावर जरीचे कुडते व अंगरखा घातला. डोक्यास जिरेटोप घातला. त्यावर मंदिल बांधला. एका अस्तनीत बिचवा लपवला. हातात पट्टा घेतला. शिवराय खानाच्या भेटीसाठी तयार झाले. 

.............................................................................................

.............................................................................................

बाहेर सरदार उभे होते. शिवराय त्यांना म्हणाले, "गड्यांनो, आपापली कामे नीट करा. भवानीआई यश देणार आहे. पण समजा आमचे काही बरे वाईट झाले, तर तुम्ही धीर सोडू नका. संभाजी राज्यांना गादीवर बसवा. मासाहेबांच्या आज्ञेत वागा. स्वराज्य वाढवा. रयत सुखी करा. आम्ही निघालो!" शिवराय निघाले. बरोबर वकील आणि जिवा महाला इत्यादी दहा अंगरक्षक होते.

खान शिवरायांच्या आधीच शामियान्यात येऊन बसला होता. मनोराज्य करत होता. त्याच्या शेजारी सय्यद बंडा नावाचा त्याचा हत्यारबंद शिपाई उभा होता. तो पट्टा चालविण्यात मोठा पटाईत होता. शिवराय श्‍यामियान्याच्या दाराजवळ आले. सय्यद बंडाकडे पाहताच ते तेथेच उभे राहिले. खानाने महाराजांच्या वकिलाला विचारले, "शिवाजीराजे आत का येत नाहीत?''

वकील म्हणाला, "ते सय्यद बंडाला भितात. त्याला तेवढा दूर करा !" सय्यद बंडा दूर झाला. शिवराय आत गेले. खान उठून म्हणाला, "या शिवाजीराजे, भेटा आम्हाला."

..............................................................................................

.......................................................................................

अफजलखानाशी झटापट : महाराज सावध होऊन पुढे झाले. खानाने शिवरायांना आलिंगन दिले. धिप्पाड खानापुढे शिवराय खुजे वाटत होते. शिवरायांचे मस्तक खानाच्या छातीवर आले. त्यासरशी खानाने शिवरायांना ठार करण्यासाठी त्यांची मान आपल्या डाव्या बगलेत दाबली आणि दुसर्‍या हाताने शिवरायांच्या कुशीत कट्यारीचा वार केला. शिवरायांच्या अंगावरील अंगरखा टर्रकन फाटला. अंगरख्याखाली चिलखत असल्यामुळे शिवराय बचावले. त्यांनी खानाचा डाव ओळखला. अत्यंत चपळाईने त्यांनी बिचवा खानाच्या पोटात खुपसला. खानाची बाहेर पडली. खान कोसळला.

.......................................................................................

.......................................................................................

 एवढ्यात त्याचा वकील कृष्णाजी भास्कर पुढे आला. त्याने शिवरायांवर तलवारीचा वार केला, पण शिवरायांनी पट्ट्याच्या एका घावात त्याला ठार केले. ही खणाखणी ऐकून सय्यद बंडा शामियान्यात घुसला. तो शिवरायांवर वार करणार तेवढ्यात जिवाजी महाला धावून आला. सय्यद बंडाचा वार आपल्या अंगावर घेऊन जिवा महालाने एका घावात सय्यद बंडाला जागच्या जागी ठार केले. 'होता जिवा म्हणून वाचला शिवा', अशी म्हणच पुढे रूढ झाली.

.......................................................................................

......................................................................................

खरा इतिहास काय ? असं तुम्ही विचारले आहे. म्हणजे तुम्हाला जिवा महाल ह्यांच्या इतिहास माहीत आहे पण तो चुकीचा किंवा अर्धवट वाटत असेल असं मी समजून उत्तर देतो.

जिवा महाल ह्यांच्या बद्दल आपण लहानपणी शालेय शिक्षण घेताना ऐकलं आहे ते हे की,"होता जीवा,म्हणून वाचला शिवा."

                               जिवा महाला

त्या मागचा इतिहास असा होता की जेंव्हा आदिलशाही सरदार अफझलखान स्वराज्यावर चालून आला, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज स्वसंरक्षणासाठी प्रतापगडवर गेले. प्रतापगडावर चाल करून जाण सोपं नाही हे अफझलखान ह्यास माहित होतं.कारण अफझलखान स्वतःत पूर्वी जावळी प्रांताचा सुभेदार होता. त्यामुळे त्यानें शिवाजी महाराज स्वतः जावळी सोडून बाहेर यावेत ह्यासाठी खूप प्रयत्न केले (म्हणजे रयतेला त्रास दिला, मंदिरे पडली, इत्यादी).तरी महाराजांनी प्रतापगड सोडला नाही. उलट महाराजांनी ओळखलं की अफजलखान असा जाणार नाही. त्यांनी स्वतःकडून अफझलखानासोबत एकांतात भेट व्हावी ह्यासाठी अनुभवी अशा गोपीनाथ पंत यांची दूत म्हणून नेमणूक केली. त्यांनी त्यांचे काम उत्तम प्रकारे पार पाडून अफझलखान आणि महाराजांची भेट घडवून आणायचं ठरवलं. त्याप्रमाणे स्वतः सोबत फक्त दोन माणसं बरोबर घेऊन महाराज आणि अफझलखान ह्यांची भेट होणार होती. अफझलखान ह्यास सय्यद बंडा ह्याशिवाय कोणावर ही विश्वास न्हवता .म्हणून त्याने फक्त त्याची निवड केली. शिवाजी महाराजांनी प्रत्येक अनुभवी माणसाना एक एक कामगिरी वाटून दिली. आता फक्त बरोबर घेऊन जायची दोन माणसं निवडायची होती. अर्थातच महाराजांनी त्यांची निवड आधीच केली होती. पहिला होता , संभाजी कावजी. ह्याने प्रतापगडावर चिखलात अडकलेल्या तोफेच चाक उचलून तोफ जागेवर पोहोचवताना शिवाजी महाराजांनी पाहिलं होतं. दुसरा होता जिवा महाल. जिवा महाल हे महाराजांचे न्हावी होते. पण एकदा असा एक प्रसंग आला की त्या वेळेस जिवा महाल ह्यांनी गुढग्यावर चालत जाऊन एकाच्या हातावर नारळ अलगत मधून कापला होता. त्याबद्दल महाराजांनी जिवा कडे विचारपूस केली तेंव्हा त्याने सांगितले की, पोटापाण्यासाठी लहानपणी तो खेळ करायचा. त्यात ही कला त्याला अवगत आहे.

ठरलं . महाराजांनी दोघांना काम वाटून दिल. काही झालं तरी संभाजी कवजीने फक्त अफझलखानावर लक्ष ठेवायचं आणि जिवाने फक्त सय्यद बंडावर लक्ष ठेवायचं. महाराज आणि अफझलखान ह्यांनीची भेट झाली. अफझलखान ह्याने दगा केला आणि महाराजांना आपल्या बकोटीत दाबून त्यांच्यावर वार केला. प्रतिकार म्हणून महाराजांनी अफझलखानावर वार केला. त्यावेळी आवाज ऐकून सय्यद बंडा आत आला. त्याने दांडपट्टा उगारल्याबरोबर त्याच्यावर लक्ष ठेऊन असलेल्या जिवाने खाली गुढग्यावर बैठक घेत त्याचा हात कलम केला. अफझलखान ह्याने महाराजांच्या जिरेटोपवर वार केला. महाराज ह्या हल्ल्यातून सावरे पर्यंत खान आपल्या पालखीकडे पळाला. संभाजी कावजी त्याच्या मागून पळाला. त्याने पालखी उचणाऱ्या भोयांचे पाय कापले तशी पालखी खाली पडली. संभाजी कवजीने त्याच्या छातीत तलवार खुपसली आणि त्याच मुंडकच छाटल.

.........................................................................................

अफजलखानाच्या फौजेची दाणादाण : विजयी शिवराय गडावर गेले. इशार्‍याची तोफ झाली. शिवरायांच्या सैन्य इशाऱ्याची वाट बघत होते. तोफ होताच झाडीत लपून राहिलेले शिवरायांचे सैनिक खानाच्या सैन्यावर तुटून पडले. खानाच्या फौजा बेसावध होत्या. त्यांना पळायलाही वाट सापडेना. मराठ्यांनी जोराचा पाठलाग केला आणि खानाच्या फौजेचा धुव्वा उडवला. अफजल खानाचा मुलगा फाजलखान कसाबसा निसटला व विजापूरला पोहोचला. त्याने सांगितले की बातमी ऐकून विजापुरात हाहाकार उडाला.



 विजापूरचा सर्वात बलाढ्य सरदार शिवरायांनी हांहां म्हणता धुळीस मिळवला. शिवरायांचे नाव चहुकडे दुमदुमले. त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे सह्याद्रीच्या कड्याकपारीतून घुमू लागले.

.........................................................................................

..................................................................... .................

संकलन : सुमित रवि सरवदे.

Comments

Popular posts from this blog

१०. शायिस्तेखानाची फजिती

शायिस्तेखानाजी स्वारी: विजापूरच्या आदिलशाहाने जंगजंग पछाडले. पण शिवरायांपुढे त्याचे काही चालले नाही. त्याच्या प्रत्येक सरदाराला शिवरायांनी चांगलाच हात दाखवला. शेवटी आदिलशाहा नरम झाला. त्याने शिवरायांशी तह केला आणि स्वतंत्र राज्य मान्य केले. यामुळे काही काळ दक्षिणेची बाजू सुरक्षित झाली. मग शिवराय उत्तरेतील मुघलांकडे वळले. मुघलांच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्राची धुळधाण उडाली होती. त्या वेळी दिल्लीला औरंगजेब हा मुघल बादशाह होता. त्याच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या. त्यामुळे बादशहा चिडला. त्याने आपुला मामा शायिस्तेखान याला शिवरायांवर पाठवले. तो पुण्यावर चालून आला. त्याच्याकडे पाऊण लाख सैन्य होते. शेकडो हत्ती,उंट आणि तोफा होत्या. शिरवळ, शिवापूर, सासवड अशी गावे घेत घेत शायिस्तेखान आला. त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. तो पुढे पुढेच येत होता. आणि एकदा मात्र डोंगराच्या खिंडित मराठ्यांनी त्याला गाठले. मराठे अतिशय चपळ, भीमथडी तट्टावर बसणारे ! चटणी-भाकर खावी, अंगावर घोंगडी टाकावी आणि वाऱ्याच्या वेगाने डोंगरदऱ्यांतून धावपळ करावी, यांत मराठे फार पटाईत. मराठयांच्या गनिमी काव्यामुळे शायिस्तेख...

६. स्वराज्याचे तोरण बांधले

रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसह, स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. पण केवढे अवघड कार्य होते ते ! दिल्लीचा मोगल बादशहा, विजापूरचा आदिलशाही सुलतान, गोव्याचे पोर्तुगीज, आणि जंजिऱ्याचा सिद्धी अशा चार सत्ता त्या वेळी महाराष्ट्रावर हुकूमत गाजवत होत्या. या सत्तांचा दरारा मोठा होता. त्यांच्याविरुद्ध ब्र काढायची कुणाची हिंमत नव्हती. अशा बिकट परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्याचा मंत्र उच्चारला होता. कुठे शत्रूच्या फौजांचे अफाट बळ आणि कुठे शिवरायांच्या सवंगड्यांचे अल्प बळ ! शिवरायांचा निश्चय अढळ होता. त्यातूनच बळ निर्माण झाले. तोरणगड : शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व इंदापूर या परगण्यांची जहागिरी होती. जहागिरीतील किल्ले विजापूर दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते. किल्ल्यांशिवाय कसले आहे स्वराज्य. ज्याचे किल्ले त्याचे राज्य ! किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता चालते. डोंगरी किल्ला म्हणजे राज्याचा एक मुख्य आधार. तेव्हा एखादा भक्कम केला लवकर हस्तगत केला पाहिजे, असे शिवरायांनी मनाशी ठरवले.  तोरणा किल्ला शिवरायांचा डोळ्यापुढ...

३.मराठे सरदार-भोसल्यांचे कर्तबगार घराणे

धामधुमीचा काळ : संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला. तर शूर मराठे सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली. तो काळच मोठा धामधुमीचा होता. महाराष्ट्रात आदिलशहा आणि निजामशहा यांच्यात नेहमी लढाया होत. लढाईसाठी त्यांना फौज लागे. या कामी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत. शूर मराठे सरदार : मराठे काटक व शूर होते. तसेच ते धाडसी होते, स्वामीनिष्ठ होते. लढाईवर मोठ मोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे. हातात भाला, कमरेला तलवार असे हे धाडसी मराठा जवान घोड्यावर मांड घालून सरदारांच्या फौजेत दाखल होत. मराठे सरदार फौजबंद असत. कोणताही फौजबंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला, की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी. त्याला सरदारकी देई कधीकधी जहागिरीही देई. जहागिरी मिळालेले सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे समजत. विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठे मोठे मराठे सरदार होते. त्यात सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे, वेरुळचे भोसले हे प्रमुख होते. सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज. जिजाई सिंदखेडच्या लखुजी जाधवांची मुलगी ...